'ये रे येरे पावसा तुला देतो पैसा' अशी आळवणी करत जून महिन्याचे आगमन होते. हा महिना म्हणजे पावसाळ्याची सुरुवात आणि शाळा नव्याने उडण्याची सुदधा. पावसाळ्याची छत्री, रेनकोट, पावसाळी बूट - चपला यांची जमवाजमव तर शाळेसाठी नवीन कंपास पेटी, नवीन गणवेष! या दोन्हीच्या खरेदीसाठी दुकानामध्ये बालक - पालकांची अलोट गर्दी उसळते.
कुठल्याही गोष्टीची नव्याने सुरुवात म्हटली कि त्यासाठी 'पूर्वतयारी' हवी. आता ही पूर्वतयारी फक्त वस्तूंपर्यंतच मर्यादित नसून मानसिक तयारी ची सुद्धा गरज असते. त्यातून जर एखादे मूल विशेष/खास/ अपवादात्मक असेल तर अशा तयारीची जास्तच गरज असते.
विशेष गरजा असलेल्या आपल्या मुलासाठी जर नव्यानेच शाळेत प्रवेश घेत असाल तर खालील गोष्टींची मदत होऊ शकेल.

- शाळा सुरु होण्यासाठी मुलाला अनौपचारिक रित्या शाळेचा फेरफटका करून आणा.
- शाळेच्या वेळेची सवय करा. मुलाची आंघोळ, झोप याचे वेळापत्रक शाळेच्या वेळापत्रकाप्रमाणे काही दिवस आधीपासून आखा आणि पाळा.
- शाळेमध्ये नवीन मित्र - मैत्रिणी मिळतील, तिकडचे मजेदार अनुभव याबद्दलचे कुतूहल निर्माण करा.
- मुलांच्या प्रतिक्रिया तीव्र असू शकतील तरीही नवीन दिनक्रम अंगवळणी पडेपर्यंत धीर धरा.
- ह्या सर्व प्रक्रियेमध्ये घरातल्या सर्वांना सहभागी करून घ्या. मोठे भावंड असेल तर त्याचे अनुकरण करत हे धाकट खास मूल लवकर शिकते असा बहुदा अनुभव येतो. तसेच वडिलांचा सहभाग असेल तर ही प्रक्रिया फारच सुकर होते.
No comments:
Post a Comment