Pages

Friday, May 21, 2010

९ मे मातृदिन - 'माँ तुझे सलाम !'


'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' असे म्हटले जाते. अगदी हल्लीच्या फिल्मी भाषेत जर सांगायचे झाले तर शशी कपूर म्हणतो तसं - 'मेरे पास माँ है !' आपल्या समवेत आई असेल तर त्रिभुवन प्राप्त असल्या सारखेच आहे. ह्या वाक्याची प्रचीती मला दरदिवशी येते.

मे महिना माझ्यासाठी खूप धावपळीचा असतो. सर्व पालकांची अशी इच्छा असते कि मी त्यांच्या पाल्याचे अभ्यासाचे / सुधारोद्देशी उपायांचे जास्तीचे तास घेऊन उणीव भरून काढावी. अशावेळेला बहुतांशी आईच आपल्या मुलाला माझ्याकडे घेवून येते तसेच वेगवेगळ्या थेरेपी साठीसुद्धा घेऊन जात असते. एक थेरेपी क्लास दादरला, तर दुसरा वांद्र्याला तर तिसरा प्रभादेवीला. न थकता, न भागता घरची सर्व कामे आटोपून, कधी कधी तर धाकट बाळ सोबतीला घेवून आपल्या बाळाचे आयुष्य मार्गी लावण्यासाठी हि आई मुंबई उलट - सुलट पालथी घालत असते. हे माझे आजचे संपादकीय अशा ह्या प्रत्येक आईला ह्या अद्वितीय मातेला अर्पण केलेले आहे.

No comments:

Post a Comment